बीड: तालुक्यातील तलवाडा येथील साईराम अर्बन बँकेतील तीजोरी फोडण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला. बुधवारी पहाटे ही घटना घडली असून, बँकेचे शटर तोडून चोरांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर रोख रक्कम असलेली तिजोरी फोडण्याचा त्यांनी निष्फळ प्रयत्न केला. शेवटी तिजोरी काही फुटलीच नाही. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन बँकेची पाहणी केली.
तलवाडा येथील नवीन बस स्थानकावरील जिजामाता ग्रामपंचायत सचिवालयात असलेल्या साईराम अर्बन बँकेमध्ये बुधवारी पहाटे चोरांनी शटर तोडून बँकेत प्रवेश केला. त्यांनतर बँकेत रोख रक्कम असलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला केला पंरतु चोरांना तिजोरी फुटलीच नाही. याची माहिती मिळताच तलवाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. बीड येथून ठसे तज्ञ तलवाडा येथे दाखल झाले होते.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे साईराम अर्बन बँक असून या बँकेचा सुरक्षा रक्षक कोरोना बाधीत असल्याने सध्या उपचार घेत असून या संधीचा फायदा घेऊन चोरांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरांनी बँकेत प्रवेश करून बँकेचे शटर तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तिजोरी फुटली नाही. त्यामुळे चोरांनी बँकेतील सिसीटीव्हीसह अन्य वस्तुची तोडफोड करत सिडीआर घेऊन पसार झाले. बँकेने बाहेरच्या शटरच्या बाजूने दोन सिसिटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यातील एक कॅमेरा चोरांनी तोडून शटरच्या बाजूने फेकुन दिला असुन डिवीआर चोरांनी सोबत घेऊन गेले आहेत. बाजूच्या सिटेक एमएससीआयटी संगणक केंद्राचा पण दरवाजा तोडून लॅपटॉप लांबवला आहे.
बुधवारी सकाळी या चोरीच्या प्रकाराची बँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्युटीवर आल्यावर माहिती मिळाली. त्यांनी माहिती दिल्यांनतर तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे हे घटनास्थळी दाखल झाले. तलवाडा पोलिसांनी बीडहून ठसे तज्ञास पाचारण केले. या प्रकरणी अधीक तपास सुरू आहे. दरम्यान या बँकेच्या परिसरातील व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशियत चोरांच्या विरोधात तलवाडा पोलिस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू होती.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेतील कोरोनामुक्त झालेल्या गावात कोरोनाचा शिरकाव
- तेलगावातील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरु करा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करणार – जिल्हाधिकारी रवींद्र जगताप
- पेठ बीड येथे जुगार अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत, सात जण फरार
- ‘अडचणीच्या काळात भारताला मदत करताना अमेरिकेला समाधान वाटतंय’
- कोरोनासाठी आ. सतिश चव्हाण घाटीला देणार ‘इतका’ निधी!


