Share

निलेश लंके तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत याचा आम्हाला अभिमान – सुप्रिया सुळे

Published On: 

अहमदनगर : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांचा प्राणास मुकावे लागत आहे.

अशातच, पहिल्या लाटेत नागरिकांची प्रचंड हेळसांड झाल्यानंतर या लाटेत काही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आक्रोशातुन बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मागील लाटेसह या लाटेत देखील रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

‘माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत,’ असा निर्धारच निलेश लंके यांनी केला आहे. निलेश लंके यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले होते. यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला होता. तर, या लाटेत देखील त्यांनी आणखी एक कोविड सेंटर उभारलं असून या सेंटर्सच्या कारभारावर लंके स्वतः लक्ष ठेवून आहेत.

आता निलेश लंके यांच्या कार्यच कौतुक राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. ‘निलेश लंके तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आहेत याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे,’ असं सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळेंनी फेसबुक पोस्टद्वारे केलं निलेश लंकेच्या कार्याचं कौतुक –

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी,ता. पारनेर येथे आदरणीय शरद पवार साहेबांच्या नावाने ११०० बेडचे कोविड सेंटर उभारले असून त्यात १०० ऑक्सिजन बेड आहेत. स्वतः निलेश लंके या सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेची विचारपूस करतात. याशिवाय या कोविड केअर सेंटरच्या कामकाजावर स्वतः देखरेख करतात.त्यांचे हे कार्य सर्वांसाठीच आदर्शवत आहे.निलेश, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आहात ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब व पवार साहेब यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सुत्र सांगितले त्याचे तुम्ही पालन करीत आहात,याचा आनंद वाटतो.या कोविड केअर सेंटरच्या उभारणीबद्दल तुमचे मनापासून आभार. या कोविड केअर सेंटरमधून प्रत्येक रुग्ण बरा होऊन आपल्या घरी सुखरुप परत जावा ही प्रार्थना.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!