Share

जालन्यात पालिकेच्या कर विभागाला आग; महत्वाचे कागदपत्रे जळून खाक

Published On: 

जालना: नगर पालिकेतील कर विभागाला काल बुधवारी रात्री उशिरा अचानक आग लागल्याने या विभागातील फर्निचर, खुच्या, टेबलसह महत्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. दरम्यान, कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनेदरम्यान सुरक्षारक्षकही ड्युटीवर असताना आगीची घटना लक्षात कशी आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पंचनामा झाल्यानंतर याची चौकशी केली जाईल, असे सांगितले.

जालना नगर पालिका इमारतीच्या दहा नंबरच्या दालनात कर विभागाचे कामकाज चालते. सध्या वसुलीची गती मंदावली असली तरी या विभागात नामांतराच्या अनेक प्रकरणांच्या फायली तसेच इतर महत्वाचे दस्ताऐवज असल्याने कर विभागाला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत कर विभागातील रेकॉर्डरूमधील जवळपास सर्वच रेकॉर्ड अक्षरश: जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांसह घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु आगीचा धूर जास्त आसल्याने हाती काहीच लागले नाही तो पर्यंत सर्व कागद पत्रे जळून खाक झाले होते.

नगर पालिकेत आग कशी लागली यामागे कारण काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडतोय दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी पालिकेत येवून आग विझवली. घटनेच्यावेळी नगर पालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते की नाही, तीन सुरक्षारक्षक ड्युटीवर होते. त्यामुळे मुख्याधिकारी नार्वेकर यांनी पोलिसांचा पंचनामा होईपर्यंत नेमके कोणते रेकॉर्ड जळाले हे आताच सांगता येणार नसल्याचे सांगितले. आद्यप आगीचे कारण अस्पष्ट आसल्याने तथापि, पंचनामा झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच सकृतदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!