मुंबई – राज्यातील स्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून चिंताजनक बनली असल्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी आपापल्या राज्यात परत जाण्याचा निर्णय घेत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये परराज्यात गेलेले स्थलांतरित मजूर परतल्यावर त्यांची नोंद करा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. दरम्यान या मागणीची दखल घेत आता या मजुरांची नोंद ठेवावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले आहेत.
कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे काल बोलत होते. यावेळी त्यांनी ही विशेष सूचना प्रशासनाला केली. मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉक डाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहावेत, अर्थचक्राला झालं बसू नये मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केली आहे का ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आत्तापासून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- लोकप्रिय पत्रकार रोहित सरदाना याचं निधन, कोरोना उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका
- कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा; १०२ वर्षीय कोरोनामुक्त आजींचा मोलाचा सल्ला
- मुंबईची बातच न्यारी; पोलार्डने मारला चक्क हेल्मेटने चौकार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?
- सामना सुरु असताना कार्तिक भीडला धवनला, ‘गब्बर’नेही दिले असे उत्तर; व्हिडीओ व्हायरल


