औरंगाबाद : मनपाच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधील रेमडेसिवीर चोरी प्रकरणात मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र या प्रकरणी शुक्रवारी (दि.३०) रात्री उशिरा आरोग्य विभागातील विष्णू रगडे व कंत्राटी कर्मचारी प्रणाली कोल्हे या दोन जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत.
महापालिकेच्या स्टोअर रुममधून २० एप्रिल रोजी रेमडेसिविर इंजेक्शनचे २६ बॉक्स मेल्ट्रॉन कोविड सेंटरला पाठविण्यात आले. मेल्ट्रॉन मधील कर्मचाऱ्यांनी हे बॉक्स स्विकारले. २४ एप्रिल रोजी शेवटचा २६ वा बॉक्स फोडला असता त्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन ऐवजी एमपीएस इंजेक्शन आढळून आले. मेल्ट्रॉनच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांनी तातडीने वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून दिले. त्यानंतर पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तातडीने चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
चौकशीमध्ये स्टोअर रुममधून रेमडेसिवीरचा बॉक्स गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्टोअर मधील पाच कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावून २४ तासात त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला. कर्मचा-यांचा खुलासा प्राप्त होताच आयुक्त पांडेय यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने ४८ रेमडेसिविर इंजेक्शन गायब केल्याप्रकरणी पोलीसात तक्रार देण्याच्या हालचाली सुरू केल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.
रगडे निलंबित, महिला सेवामुक्त
गहाळ झालेल्या रेमडिसिवीर इंजेक्शन प्रकरणी पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य फार्मसिस्ट बी.डी. रगडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर सहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कॉलगर्ल म्हणून महिलेची बदनामी, गुन्हा दाखल
- श्वास गुदमरतोय ! ऑक्सिजन अभावी डॉक्टरसहित 8 रुग्णांचा गेला जीव…
- हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीचे उजनी धरणात जलसमाधी आंदोलन
- ‘…गर्जा महाराष्ट्र माझा’ ; मुंबई इंडियन्सने महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा !
- बीडमध्ये दुकानदारांवर कारवाई; ४० हजारांचा दंड वसूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

