Share

महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये विशेष लसीकरण; मात्र लसीसाठी नोंदणी आवश्यक

Published On: 

बीड: जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. कोरोनाची लागण होऊ नये या साठी नागरिक लसीकारणाला देखील गर्दी करत आहेत. तसेच शनिवारी म्हणजेच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असून महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात विशेष लसीकरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यातील पाच केंद्रावर विशेष कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील गेवराईसह बीड, आष्टी, परळी, आणि अंबाजोगाई या पाच ठिकाणच्या शासकीय रुग्णालयात शनिवारी प्रत्येकी दोनशे जणांना लस दिली जाणार आहे. लस घेण्यासाठी मात्र जिल्ह्याच्या कोरोना पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी साडेचार हजार नागरिकांना कोरोनाची लस दिली. आता १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार असून त्यासाठी सर्वत्र  लस उपलब्ध करण्यात येत आहे.  शनिवारी पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात होणार आहे. परंतु, पोर्टलवर ज्यांनी लसीसाठी नोंदणी केली अशांना नियोजित वेळेत लस दिली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!