बीड: रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता भासत आहे तसेच इतर वैद्यकीय सुविधा नवीन कोरोना रुग्णांना मिळायला उशीर होत असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नवीन कोविड केअर सेंटर तसेच रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवण्याचे काम प्रशासन करत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात येत्या तीन दिवसात १० व्हेंटिलेटरसह २० खाटांचा आयसीयू वॉर्ड सुरु करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात तीन दिवसांत १० व्हेंटिलेटरसह २० खाटांचा आयसीयू वॉर्ड रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. त्यामुळे निश्चितच कोरोना रुग्णांचे जीव वाचणार असून हा आयसीयू वॉर्ड डॉ. पारस मंडलेच्या यांच्या निगराणीखाली असणार आहे. शहरातील आयटीआय येथील कोविड सेंटरमध्ये जवळपास दोनशे ऑक्सिजन बेडचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. यामुळे शहरातील कोरोनाबाधित व संशयित रुग्णांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासह त्यांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना नगरसेवक अमर नाईकवाडे व गटनेते फारुख पटेल यांनी काही सूचना केल्या होत्या. या सूचना या यंत्रणेतील दोष दूर करण्यासंदर्भातील आहेत. या सूचनांवर आरोग्य प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी सध्या नाईकवाडे व पटेल यांचा पाठपुरावा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- कॉलगर्ल म्हणून महिलेची बदनामी, गुन्हा दाखल
- श्वास गुदमरतोय ! ऑक्सिजन अभावी डॉक्टरसहित 8 रुग्णांचा गेला जीव…
- हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीचे उजनी धरणात जलसमाधी आंदोलन
- ‘…गर्जा महाराष्ट्र माझा’ ; मुंबई इंडियन्सने महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा !
- बीडमध्ये दुकानदारांवर कारवाई; ४० हजारांचा दंड वसूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

