Share

नितेश राणेंनी ठाकरेंना पाठवले पत्र; म्हणाले, फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचे श्रेय….

Published On: 

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोरोना काळातील महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. कोरोना काळात आरोग्य सेवकांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांच्या नशिबी फरपट आणल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी दवाखान्यांना लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळतीमुळं आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात फ्रटलाईन वर्कर्स, कोविड वॉरिअर्स यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची सेवा केली त्यांच्या नशिबी आघाडी सरकारनं फरपट आणून ठेवल्याचं नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

फ्रंटलाईन वर्कर्सनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं हे शिवसेनेचे स्वार्थी धोरण अत्यंत निंदनीय असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. महापालिकेतील वस्तुस्थिती तुमच्यापासून लपवली गेली असेल याची मला खात्री आहे म्हणूनच हे वास्तव तुमच्यापुढे मांडत आहे, असं नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. निदान फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनाही ठाकरे सरकार त्यांच्यासोबत संधीसाधूपणाच राजकारण करत नाही ना, अस वाटू नये, असा खोचक टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!