Share

अरबी समुद्राला ‘सिंधुसागर’ हेच नाव योग्य- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Published On: 

मुंबई : अरबी समुद्रा्च्या नामकरणाचे सुतोवाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. सिंधू नदी पाणीवाटपाच्या समस्येवरील दोन पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील अरबी समुद्राच्या नामांतराचे सूतोवाच केले. भौगोलिक परिस्थिती नेहमी बदलत असते, त्यामुळे सिंधू नदी पुनश्च भारताचा भाग असेल. मुंबईतील अरबी समुद्राला वास्तविक ‘सिंधुसागर’ हेच नाव सार्थ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

राजभवनात अशोक मोटवानी आणि संत कुमार शर्मा लिखित ‘इंडस वॉटर्स स्टोरी’ आणि उत्तम सिन्हा लिखित ‘इंडस बेसिन इंटरप्टेड’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी बोलताना अरबी समुद्राच्या नामांतरावर भाष्य केले आहे.

सिंधू नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परिमाण आहेत. सिंधू नदी पुनश्च भारताचा भाग बनेल, असा आशावादही कोश्यारींनी व्यक्त केला. मुंबईतील अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव योग्य आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील अतिशय संवेदनशील असा पाणीवाटपाच्या प्रश्नाचा इतिहास, वर्तमान स्थिती, चिंता आणि भवितव्याचा वेध या बाबींचा या दोन्ही पुस्तकांमध्ये ऊहापोह केला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला लेखक अशोक मोटवानी यांच्यासह अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासातील अधिकारी स्कॉट टिकनॉर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे संघचालक डॉ. सतीश मोढ, ‘ऑर्गनायझर’चे माजी संपादक डॉ. शेषाद्री चारी, मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे मुख्याधिकारी डॉ. आशीष चौहान, प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा, डॉ. राधाकृष्ण पिल्लई, एस. बालकृष्णन, बाळ देसाई आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!