🕒 1 min read
उस्मानाबाद: पालिका अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास निलंबित का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्याला बजावली आहे. तुळजापूर येथील १२४ भक्त निवास कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्थेची जबादारी असणऱ्या पालिका अधिकारी योग्य पद्धतीने जबाबदारी सांभाळत नसल्याने येथील उपचारासाठी असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच दिलेल्या नोटीसीचा खुलासा २४ तासात करण्याचे आदेश पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तुळजापूर येथील १२४ भक्त निवास कोविड केअर सेंटर येथील व्यवस्थेबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मुलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी असणारे पालिकेचे कर निर्धारक शिवरत्न आतकरे यांच्या निष्काळजीपणाचा फटका कोरोना रुग्णांना बसत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आतकरे यांनी १२४ भक्त निवास येथे थांबून स्वच्छता, पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था पाहणे गरजेचे असताना नेहमी गायब असल्याचा तक्रारी होत्या. अखेर या प्रकरणी कोविड-१९ च्या कालावधीत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस शिवरत्न आतकरे यांना बजावण्यात आली आहे. २४ तासांच्या आत नोटिसीचा खुलासा करण्याचे निर्देश मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी दिले आहेत.
भक्त निवासमध्ये १४५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले. यामुळे जबाबदारी वाढली आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. शनिवारी सायंकाळी १२४ कोविड केअर सेंटरमधील वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. यासंबंधी आतकरे यांच्याशी वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु आतकरे यांनी प्रतिसाद दिला नाही.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘देवियो-सज्जनो, हो जाइए तैयार’ ; केबीसीसाठी आज रात्रीपासून नोंदणी सुरू
- संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला करणारे चार आरोपी अटकेत, इतर समाजकंटक फरार
- प्रत्यर्पण टाळण्यासाठी फरार नीरव मोदीने केली ‘ही’ नवीन खेळी
- मंठा रुग्णालयाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; ऑक्सिजन प्लँटसह कार्डियाक रुग्णवाहिका होणार उपलब्ध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
