Share

मंठा रुग्णालयाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; ऑक्सिजन प्लँटसह कार्डियाक रुग्णवाहिका होणार उपलब्ध

Published On: 

जालना: जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ते सर्व उपाययोजना करत असून ग्रामीण भागात देखील आता कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत याची सोय करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंठा येथे ऑक्सिजन प्लँट सुरु करण्यात येत आहेत.

वैद्यकीय आवश्यकता लक्षात घेऊन मंठा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी ८० लाख रुपये खर्चाच्या ऑक्सिजन प्लँटला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रुग्णालय पूर्णतः स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जाणार आहे. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर सर्व रिक्त पदे येत्या ३-४ दिवसांत भरली जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रविवारी येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा आणि उणिवांबाबत सविस्तर बैठक घेतली. कोविड सेंटरमधील रुग्णांची चौकशी करून त्यांना औषधोपचार कशाप्रकारे दिले जातात याची माहिती घेतली. दरम्यान, रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना विविध उपाययोजनांबाबत माहिती दिली. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा ८० लाख रुपये खर्चाचा प्लँट येत्या आठ दिवसांत कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येत्या तीन ते चार दिवसांत डॉक्टरची आणि नर्सची सर्व रिक्त पदे भरणार असल्याची ग्वाही दिली. शिवाय नर्सची आवश्यक पदे स्थानिक पातळीवरून भरण्याच्या सूचना दिल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!