Share

मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान शहीद 

Published On: 

बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक झाली असल्याची घटना आज दुपारी घडली आहे. बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील टेकुलगुडम- तर्रेम जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे. दुर्दैवाने या चकमकीत ५ जवान शहीद झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. तर ३ नक्षली मारले गेले आहेत. बिजापूर एसपीनी चकमक सुरू असल्याची कबुली दिलेलेई आहे.

बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षविरोधी अभियानामध्ये एसटीएफ, डीआरबी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाचे ४०० जवान सहभागी झाले होते. शोध अभियानादरम्यान नारायणपूर येथे जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूने यावेळी तुफान गोळीबार झाला. यात दोन नक्षलवादी ठार झाले, तर पाच जवान शहीद झाले. तसेच १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती डीजीपी डीएम अवस्थी यांनी दिली आहे.

शहीद जवानांमध्ये तीन डीआरजीच्या तर दोन सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. तसेच या चकमकीत एकूण २० जण गंभीर जखमी झाले आहेत. बिजापूरच्या तारेम येथे ही चकमक झाली. नक्षलविरोधी अभियानातील ४०० जवान आणि पोलीस तारेम पोलीस ठाण्याकडे जात असताना सिलगेरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी या टीमवर हल्ला केला. त्यामुळे झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. तर तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!