Share

आमदार दानवेंनी जिल्हातील प्रश्न अर्थसंकल्पात मांडले, लोकसभेची तयारी ?

Published On: 

औरंगाबाद :  आमदार अंबादास दानवेंनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तब्बल २३ प्रश्न मांडले आहेत. तसेच या माध्यमातून मांडलेले जास्तीत जास्त प्रश्न हे औरंगाबाद ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार आणि नुकतेच प्रवक्ते पदी निवड झालेले अंबादास दानवे हे औरंगाबाद लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी करत आहेत का? असे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे.

आमदार झाल्यानंतरचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, जे की त्यांनी शेंद्रा औद्योगीक वसाहतीला जोडणारा औरंगाबाद – जालना दुरस्तीबाबत, सिल्लोड तालुक्यातील सिंचन कामातील गैरव्यवहार, निकृष्ठ दर्जाबाबत, पैठणच्या जायकवाडी, जिल्हातील दुधना नदी, पश्चिमी नद्यांचे गोदावरी – तापी नदीला वळवावे, फुलंब्री तालुक्यातील लाडसावंगी कोल्हापुरी बंधाऱ्याला तीन वर्षांपासून दरवाजे लावलेले नाही, गंगापूर – वैजापूर भाव, भावली, वाकी, मुकणे धरणे आहेत, ती वैजापुरला हलवणे तसेच कृषी, सिंचन, वीज, पाणी, रस्ते, रोजगार, सिमेंट कोल्हापुरी, नाला बंधारे, पुल, कुळ जमिन, शिक्षक भरती प्रकरण, प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांना घरे मिळण्याबाबत अशी प्रश्न विधानपरिषदेत अर्थसंकल्पाबाबत मांडली आहेत.

हे सर्व प्रश्न औरंगाबाद शहरासह ग्रामीण भाग म्हणजेच जिल्हाभरातील असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे आता आमदार अंबादास दानवे हे  २०२४ ची लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे का? याचे कारण म्हणजे लोकसभा मतदारसंघातील स्थानिक तसेच मुलभूत समस्यांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडले आहेत. त्यामुळे आता अंबादास दानवे हे खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणूक गांर्भीयाने घेत असल्याचे दिसत आहे. मागच्या वेळी लोकसभा निवडणुक लढवण्याचे त्यांनी मनावर घेतली नव्हती. तर आता जर लोकसभा निवडणुक लढवण्याचे ठरवले तर ग्रामीण भागामधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा देखील ते करु शकतात. तर आता शिवसेनेचे प्रवक्ते जिल्हाप्रमुख तथा दोन जिल्हाचे आमदार ( जालना – औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था) ते या तीन पद तसेच जबाबदारी कश्या पद्धतीने पेलतात आणि लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना त्यांच्या पक्षातून किती सहकार्य तसेच साथ मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!