मुंबई : प्रदर्शित होण्याच्या आधी वादात असलेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट फारसा प्रेक्षकांना आवडला नाही. आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाने प्रेक्षकांना नाराज केल आहे. या चित्रपटाचे आता ट्विटरवर बरेच मेम बनवले जात आहेत. सोशल मीडियावर लक्ष्मी सिनेमावर मीम्सचा धुमाकूळ सुरू आहे.
https://twitter.com/JoshiAadish/status/1326012528393138176
एका युझरने मिर्झापूर 2चा एक सीन शेअर करत म्हटलं आहे, ‘अक्षय कुमारचा लक्ष्मी सिनेमा पाहून झाल्यावर लोकं म्हणतात आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा होत्या.’ एका युझरने चक्क आयुष्मान खुराना, विक्की कौशल, शाहिद कपूर, वरुण धवन आणि टाइगर श्रॉफ हे अक्षय कुमारला उचलून नेत आहेत असं दाखवलं आहे. एका युझरने डोळ्यात चक्क टॉयलेट क्लिनर घातलाचा फोटो शेअर करत लक्ष्मी बघितल्यावर असं कॅप्शन दिलं आहे.
After 5 minutes of watchin laxmi bomb
Me #LaxmiiReview pic.twitter.com/YJwPaHo3bU— DirectBabu (@BabuDirect) November 10, 2020
after watching this#LaxmiiReview pic.twitter.com/RZkkQBPuPe
— Ar pit (@Atram__Shatram) November 10, 2020
https://twitter.com/bhakt_saffron/status/1325978698521063424
अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट काल डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असून ट्रेलर व गाण्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.
‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या नावावरून बराच वाद झाला. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं होतं. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता. तसंच श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना नोटीस पाठवली होती.
महत्वाच्या बातम्या
- फ्रान्सच्या राष्ट्रपतीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत अहमदनगरमध्ये आंदोलन!
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- बिहारच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस; पूर्ण निकाल येण्याआधीच भाजप नेत्याने दिलं श्रेय
- ‘आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवायला हवी होती’
- सांगलीत चोरांनी चोरीसाठी वापरलेली आयडिया पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

