सांगली – सांगलीत बोगदा पाडून एका सराफ दुकानात धाडसी चोरी करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आटपाडीच्या दिघांची येथील सराफा दुकानातुन तब्बल 18 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले आहेत.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघांची मध्ये एका सराफ दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे.विटा-मायणी रोडवरील विटा मर्चंट बँके समोर असणाऱ्या आदिती ज्वेलर्स या सोन्या-चांदीचे दुकानामध्ये ही चोरी झाली आहे.दुकानाच्या मागील बाजूस असणारी भीती फोडून बोगदा पाडून त्याद्वारे दुकानात शिरून दुकानात असलेले सोन्या -चांदीचे दागिने लुटण्यात आले आहेत.
यामध्ये 232 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच साडे पंधरा किलो चांदीचे दागिने आणि रोख 70 हजार असा एकूण 18 लाख 36 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. आदिती दुकानाच्या मागील बाजूस मोकळी पडीक जागी आहे,आणि चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंत फोडून बोगदा पाडत आत शिरून दुकानात असलेले ऐवज लुटले आहेत.
या चोरी मध्ये चार ते पाच जणांची टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते,अत्यंत चलाखीने ही चोरी करण्यात आली आहे.याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फ्रान्सच्या राष्ट्रपतीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत अहमदनगरमध्ये आंदोलन!
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- बिहारच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस; पूर्ण निकाल येण्याआधीच भाजप नेत्याने दिलं श्रेय
- ‘आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवायला हवी होती’
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!


