Share

क्रुझवर अटक केलेल्या एका आरोपीची आई चक्क बर्गर घेऊन एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ तरुणांना अटक झाली आहे. मात्र या आरोपींच्या कुटुंबीयांकडून पोरांचे लाड अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे. आरोपींसाठी कुटुंबीय मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं.

क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई एनसीबी ऑफिसबाहेर पोहोचली. काही मुलांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी जेवण आणि कपडे आणले आहेत. एका आरोपीचे नातेवाईक त्याच्यासाठी चक्क मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन आले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतीजा, इस्मित सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर या 8 जणांना एनसीबीने अटक केली आहे.

दरम्यान, आर्यन खानला क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे यामुळे सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. आर्यन खान याच्यासह दोन जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र आता याप्रकरणी मुंबई पोलीस देखील तपास करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!