Share

केंद्रीय पथकाकडून होणार नुकसानग्रस्त भागांची पाहणी, केंद्रीय मंत्री भागवत कराडांचे सुतोवाच!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी खुलताबाद तालुक्यातील सराई शिवारात बैलगाडीवर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. लवकरच केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली तसेच सरसकट आर्थिक मदतीची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

यावेळी नुकसानग्रस्त भीमराव खंडागळे, दिनेश अंभोरे यांच्या पिकांच्या पाहणीसाठी जातांना रस्त्यावर चिखल साचलेला होता. जिल्हा सरचिटणीस संजय खंबायते त्यानंतर त्यांनी बैलगाडीतून शेत गाठले आणि ज्येष्ठ शेतकरी युवराज नागे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकर्‍यांनी आपली करून कहाणी त्यांच्यासमोर मांडली. खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. विहिरी पडल्या. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.

अशी मागणी शेतकरी करत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांची पिके अतिपावसामुळे पाण्यात गेली आहे. कापूस, मका, सोयाबीन, आद्रक, भुईमूग, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, पावसामुळे हाताशी काढणीस आलेले पिके पावसामुळे हिरवली आहेत. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी कराड यांच्याकडे केल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती युवराज नागे, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!