🕒 1 min read
मुंबई – उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये काँग्रेसच्या महासिचव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम १४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नजरकैदेत ठेवलेल्या प्रियंका गांधींवर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त केला असून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
प्रियंका गांधी यांना आज कोर्टासमोर हजर केली जाण्याचीही शक्यता आहे. पोलिसांनी हवं तर मला अटक करावी, पण मी शेतकरी कुटुंबीयांना भेटल्याशिवाय परतणार नाही, अशी ठाम भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतली आहे. त्यांच्यावर शांतता भंग करण्यासह अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापूर्वी प्रियंका गांधी-वाड्रा सीतापूर मध्ये पोलीस कोठडीत होत्या. गांधी मागील 24 तासांहून अधिक काळ पोलिसांच्या नजरकैदेत होत्या. त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप केला. प्रियंका गांधी यांना 4 ऑक्टोबरला पहाटे साडे चार वाजता अटक करण्यात आली होती.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य केले आहे. केंद्र सरकारकडून व भारतीय जनता पार्टी कडून प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. भारतीय जनता पार्टी हे सध्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चा वरती तेथील पोलिसांनी गाडी चालवून त्यांच्या आंदोलनात उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी उठले नाही. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या उत्तर प्रदेशमधील सरकारचा आहे. हे सरकार सध्या जालियनवाला बाग सारखी कृत्ये करत आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
