औरंगाबाद: आपल्या अल्पवयीन मुलींच्या पर्समध्ये गर्भनिरोधक आणि प्रेग्नेंसी कीट सापडल्यानंतर आईला मोठा धक्का बसला. आणि त्यानंतर उघडकीस आला एक धक्कादायक प्रकार. शहरातील अल्पवयीन मुलींवर गेल्या दोन महिन्यांपासून अत्याचार सुरू होता. मात्र कोणाला याची कानोकान खबर लागली नाही. आईच्या सतर्कतेनंतर एकंदरीत प्रकार उघड झाला. आणि त्यानंतर मात्र एकच खळबळ उडाली. याप्रकरणी अरविंद सदावर्ते या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ वर्षांची मुलगी शिवण क्लासचे प्रशिक्षण घेत होती. दोन महिन्यांपूर्वी आपली गाडी रस्त्यात बंद पडल्याने तिने अरविंद सदावर्ते यांच्याकडे मदत मागितली. मात्र गाडी दुरुस्त झाली नाही. सदावर्तेने मुलीच्या आईचा नंबर घेतला आणि आईला याबाबत सूचना दिली. त्यानंतर आईच्या मोबाईल नंबर वरून तो तिच्याशी गप्पा मारु लागला. आणि अशाप्रकारे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र अचानक आईने सहजच आपल्या मुलीची तपासली असता त्यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या प्रेग्नेंसी कीट आढळून आली. याबाबत विचारपूस केली असता अरविंदशी आपले शारीरिक संबंध झाल्याचे तिने सांगितले.
प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला अनेकदा घरी नेऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ चित्रीकरणही केले. जर कोणाला सांगितले तर सदर व्हिडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. या प्रकरणानंतर मुलीच्या आईवडिलांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असता त्यात अश्लील क्लिप आढळून आली. मात्र यावेळी त्याने आपण तुमच्या मुली सोबत लग्न करेल असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर तो जो गायब झाला तो पुन्हा परतलाच नाही त्यानंतर आईवडिलांनी अखेर वाळूज पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतातही नसीरुद्दीन सारख्या…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- बुमराहचा खतरनाक यॉर्कर! भारतीय गोलंदाजाचा व्हिडिओ व्हायरल
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

