औरंगाबाद : मुकुंदवाडी भागातील घरकुल नगर भागातील एका घरात राहणारे इंद्रजीत भोलानाथ विश्वकर्मा (वय ४३) हे रात्री झोपलेले असताना, त्यांच्या उशी खाली ठेवलेला मोबाईल चोरटयाने चोरून नेला. ही घटना २० एप्रिल रात्री ११.३० ते २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली.
घरकुल नगर भागात राहणारे विश्वकर्मा हे त्यांची सगळी कामे आटपून २० एप्रिल रोजी त्यांच्या घरात झोपण्याची तयारी करत असताना, त्यांनी त्यांचा मोबाईल झोपण्याआधी पाहून त्यांच्या उशा खाली ठेवला. रात्री साडे अकरा ते २१ तारखेच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कोणी तरी अज्ञाताने तो चोरून नेला.
हि गोष्ट विश्वकर्मा यांच्या लक्षात आली. सुरुवातीला त्यांनी मोबाईलचा शोध घरातल्या घरात घेतला परंतु तो मिळाला नाही. त्यांनी थेट मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले. आणि पोलिसांना हकीकत सांगितली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
