औरंगाबाद : लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गेल्यावर अस्वस्थ वाटू लागल्याने लस न घेताच ते माघारी परतले. त्यानंतर लसींचा तुटवडा निर्माण झाला. जवळपास ३ महिन्यांनंतर मोबाईलवर दुसरा डोस घेण्यासाठी एसएमएस प्राप्त होताच त्यांना धक्का बसला. पहिल्यांदा लस घेण्यासाठी गेल्यावर रक्तदाब कमी झाल्याने डॉक्टरांनी त्याला उपचार घेण्याचा सल्ला दिला आणि तो लस न घेताच माघारी परतला. दुसरीकडे केंद्रावरील यंत्रणेने त्याचे आधार कार्ड घेऊन नोंद घेतली होती. परिणामी सरकारी यंत्रणेकडे पहिला डोस घेतल्याची नोंद झाली. या चुकीच्या नोंदीने त्याला प्रचंड मनःस्ताप झाला आहे. तो पहिला डोस द्या म्हणतोय तर यंत्रणा म्हणते दुसरा घ्या.
देवळाई परिसरातील भारतमाता कॉलनीत राहणाऱ्या राजेंद्र अंबादास सोमवंशी यांची ही कथा. सोमवंशी २१ एप्रिल रोजी आपल्या ६५ वर्षांच्या आईसोबत देवळाई परिसरातील भारत माता कॉलनीच्या लसीकरण केंद्रावर गेले होते. तब्बल दोन तास उन्हात ते रांगेत उभे राहिले. प्रचंड उकाडा आणि ऊन यामुळे राजेंद्र घामागर्द झाले. अखेर दोन तासांनी जेव्हा लस घेण्यासाठी डॉक्टरांसमोर गेले, तेव्हा राजेंद्र यांना दरदरून घाम फुटला. अस्वस्थ वाटू लागले. त्यांची स्थिती पाहून डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड लिंक केले होते.
त्यानंतर लसींचा प्रचंड शहरात लसींचा प्रचंड तुटवडा सुरू झाला तर लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी. यामुळे राजेंद्र लसीकरण केंद्राकडे फिरकलेही नाही. पहिला डोस कसा मिळेल याच विचारात राजेंद्र होते. असे असतानाच १४ जुलै रोजी राजेंद्र यांच्या मोबाईलवर एक मेसेज प्राप्त झाला. त्यात तुमच्या दुसऱ्या डोसची वेळ आल्याचे सांगण्यात आले. हा मेसेज वाचून राजेंद्र यांना धक्काच बसला. ते थेट लसीकरण केंद्रावर पोहोचले. तेथील डॉक्टरांना परिस्थिती सांगितली. मात्र कुणीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. तुमचा पहिला डोस झालेला आहे तुम्ही दुसऱ्या डोससाठी या असे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध हटवण्याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई स्वतःच निगेटिव्ह; औरंगाबादेत व्यापारी वर्गाचा संताप अनावर!
- पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर
- पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार
- ‘औरंगाबाद पालिकेकडून यावर्षी तरी संत एकनाथ रंग मंदिराचे काम होणार का ?’ कलाप्रेमींचा सवाल!
- लसींचा तुटवडा आणि त्यात भल्या मोठ्या रांगा! लस घ्यावी तरी कशी? नागरिकांचा औरंगाबाद मनपाला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
