🕒 1 min read
औरंगाबाद : सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचाही निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून या नाट्यगृहाचे नुतनीकरण केले जाणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत एकनाथ रंग मंदिराच्या कामासाठी पुन्हा एकदा डिसेंबरची नवीन डेडलाईन आता देण्यात आली आहे. चौथ्यांदा दिलेली डेडलाइन आतातरी पूर्ण करणार का? औरंगाबाद पालिकेकडून नुतनीकरणाचे काम खरच होणार का ? असाही सवाल कलाप्रेमी उपस्थित करत आहेत.
औरंगाबाद शहरात महापालिकेचे दोन नाट्यगृह आहेत. संत एकनाथ रंग मंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृह. संत एकनाथ रंग मंदिर हे अतिशय जुने नाट्यगृह आहे. जुन्या काळापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीचे केंद्र म्हणून नाट्यगृहाकडे पाहिले जाते. मात्र काही वर्षांपूर्वी याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने नूतनीकरणासाठी ते बंद करण्यात आले होते. मात्र आज पर्यंत याचे काम वेळेत होऊ शकलेले नाही. आतापर्यंत अनेक वेळा या रंगमंदिराची दुरावस्था दूर करण्यासाठी लाखोंचे कंत्राट निघाले. तरीही परिस्थिती काही सुधरलेली नाही.
वेळोवेळी निघणाऱ्या कंत्राटांमुळे रंगमंदिर नाही, तर चक्क कंत्राटदार आणि नगरसेवकांचा फायदा झाला असे आरोप झाले आहेत. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी ३० सप्टेंबर पर्यंत डेडलाईन दिली होती. मात्र आतापर्यंत मोठ्या प्रमाणात काम बाकी असल्याने चौथ्यांदा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत आतील सभागृहास रंग रंगोटी, विद्युतीकरण, स्पीकर्सचे काम आणि वातानुकूलितिचे काम पूर्ण झाले असून सभागृहाची साफ सफाई करून खुर्च्या टाकण्याचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पुन्हा हे काम ४ महिने लांबणीवर पडल्याने वेगवेगळ्या शंका कलाप्रेमींमधून उपस्थित होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप-मनसे युती होणार ? ; सुधीर मुनगंटीवारांनी दिले स्पष्ट संकेत
- याच व्यक्तीमुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झालं आहे ते कोणत्या नैतिकतेमध्ये बसते? नितेश राणे यांचा सवाल
- औरंगाबादेत सव्वा वर्षात झाल्या ९ लाख कोरोना चाचण्या!
- भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत, आशिष शेलारांची टीका
- स्मार्ट औरंगाबादचे अस्वच्छ उड्डाणपूल; रंगरंगोटी, सायकल ट्रॅकनंतर इकडेही लक्ष द्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
