🕒 1 min read
औरंगाबाद : गर्दी टाळूून शिस्तीत लसीकरण व्हावे यासाठी मनपाने विविध उपाययोजना, युक्त्या राबवल्या. मात्र याचा गैरफायदा घेणाऱ्यांनी या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरवले. त्यामुळे आता दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी टोकन पद्धती शिवाय पर्याय नाही, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरात लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज १५ ते २० हजार लसीकरणाची क्षमता असलेल्या औरंगाबाद महापालिकेला केवळ पाच ते सहा हजारांचा साठा आठवड्यातून एक ते दोन वेळा मिळत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्यांना भल्या मोठ्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.
दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी टोकन पद्धत ठेवण्यात आली आहे. नागरिकांना जास्त वेळ थांबावे लागू नये यासाठी मनपा उपाय योजना करीत असते. नाना फंडे वापरते मात्र यावर तोडगा काढता येत नाही. तर लवकर नंबर लागावा यासाठी नागरिकही विविध फंडे वापरतात. मात्र तरीही त्यांच्या नशिबी रांगेत उभे राहणेच येते. १८ वर्षांपुढील नागरिकांना लस घेण्याची परवानगी मिळाल्याने नागरिकांचाही उत्साह वाढला. मात्र त्याचवेळी लसींच्या तुटवड्यास सुरुवात झाली.
आता दर आठवड्याला केवळ ५ ते ६ हजारांचा साठा प्राप्त होत आहे. तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९५ हजारांवर गेल्याने त्यांना यात प्राधान्य दिले जात आहे. तर पहिल्या डोससाठी केवळ ऑनलाईन नोंदणी करुन येणाऱ्यांकरीता ५ केंद्र ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर दिडशे ते दोनशे डोस वितरित केले जातात. त्यानुसार दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने टोकन वाटप केले जाते. मात्र दोन दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर हे टोकन न मिळाल्याने अनेकांचा भ्रमनिरास होत आहे.
याबाबत महापालिकेच्या लसीकरण अधिकारी स्मिता नळगीरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, याआधी पालिकेने दुसऱ्या दिवशीसाठी ही आधीच टोकन देणे सुरु केले होते. मात्र काही केंद्रांवर नागरिकांनी याचा गैरफायदा घेत टोकनच्या झेरॉक्स काढून आणल्यामुळे खरे टोकन कोणाचे हा प्रश्न उपस्थित झाल्याने गोंधळ वाढला. त्यामुळे अॅडव्हान्स मध्ये टोकन देणे बंद करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका विविध उपाय योजना राबवतच असते.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप-मनसे युती होणार ? ; सुधीर मुनगंटीवारांनी दिले स्पष्ट संकेत
- याच व्यक्तीमुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झालं आहे ते कोणत्या नैतिकतेमध्ये बसते? नितेश राणे यांचा सवाल
- औरंगाबादेत सव्वा वर्षात झाल्या ९ लाख कोरोना चाचण्या!
- भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत, आशिष शेलारांची टीका
- स्मार्ट औरंगाबादचे अस्वच्छ उड्डाणपूल; रंगरंगोटी, सायकल ट्रॅकनंतर इकडेही लक्ष द्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
