औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी आहे. गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने एक टक्क्यांपेक्षा खाली येत आहे. त्यामुळे आता तरी बाजारपेठेवरील वेळेची बंदी हटवायला हवी होती, काही मुभा द्यायला हव्या होत्या. परंतु याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई स्वतःच निगेटिव्ह असल्याने दुकाने अधिक वेळ खुली ठेवण्याबाबत प्राधान्याने विचार होत नसल्याचे म्हणत व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ३.९ टक्के आहे मात्र तिथे दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्याचे संख्येत पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले आहेत. याबाबत रविवारी प्रसार माध्यमातून वृत्त कळताच शहरातील व्यापाऱ्यांचा संताप मात्र अनावर झाला. पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट औरंगाबाद पेक्षा जास्त असतानाही तिथे सात वाजेपर्यंत दुकानांना मुभा मिळू शकते. तर औरंगाबाद शहरातील पॉझिटिव्हिटी रेट तीन आठवड्यापासून एक टक्क्यांच्या खाली आहे तरी निर्बंध कायम आहेत.
पालक मंत्री देसाई यांचे व्यापाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच प्रशासनातील अधिकारी पालकमंत्र्यांना शहरातील कमी झालेल्या पॉझिटिव्हिटी रेट संदर्भात पटवून देण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे शहर संपूर्णपणे कोरोना मुक्त झाले तरीही बाजारपेठेवरील निर्बंधांमुळे छोटे-मोठे व्यापारी भरडले जात आहेत. मात्र अनलॉकबाबत तसेच सवलती देण्याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई हे स्वतः नकारात्मक आहेत. त्यामुळे अद्याप पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊनही औरंगाबाद शहरातील व्यापाऱ्यांना कुठलाच दिलासा देण्यात आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- कोल्हापूर मध्ये जलशुद्धीकरणाचे प्लांटस बंद ; पुण्यातून पाठवले १७ टँकर पिण्याचे पाणी
- ‘औरंगाबाद पालिकेकडून यावर्षी तरी संत एकनाथ रंग मंदिराचे काम होणार का ?’ कलाप्रेमींचा सवाल!
- शिवसेना-भाजप पुन्हा समोरा-समोर, भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांना जबर मारहाण
- उद्धव ठाकरेंनी बोलावली वर्षावर तातडीची बैठक- पूरस्थितीचा घेणार आढावा
- लसींचा तुटवडा आणि त्यात भल्या मोठ्या रांगा! लस घ्यावी तरी कशी? नागरिकांचा औरंगाबाद मनपाला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

