Share

“देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवरायांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य भारतीय सैन्यदलाने केले आहे. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिकृती स्थापित केली आहे. ही मूर्ती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापन करण्यात आली आहे. जगात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती एवढ्या उंचीवर बसवण्यात आली आहे. दरम्यान, देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवरायांचे हे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी केले आहे.

यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ १४ हजार ८०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला आहे.’

दरम्यान, जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील पंचवीस वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे, तर मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी सदर मच्छल या ठिकाणी स्थापित केला आहे.देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरेल. सर्व जवानांना माझा सलाम, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!