Share

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज सामन्यात घडला पुन्हा मंकडिंगचा प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने दिलेले १५३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावत सहज पार केले. यासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा गोलंदाज कायरान पोलार्डने मॅथ्यु वेडला मंकडिंगच्या प्रकारात बाद करण्याचा इशार दिला. नेहमी मध्यमगती गोलंदाजी करणारा कायरान पोलार्ड या सामन्यात ऑफ स्पिन गोलंदाजी करत होता. मात्र या षटकादरम्यान मॅथ्यु वेड चेंडु टाकण्यापुर्वीच क्रिजच्या बाहेर गेला. यावेळी पोलार्डने त्याला मंकडिंग करण्याचा इशारा दिला.

https://twitter.com/Pacebouncy/status/1419808329409482761

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. यापुर्वी भारताचा फिरकीपटू आर अश्विनने अनेकदा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाना मंकडीगचा इशारा दिला आहे. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूला एकदा. तर आयपीएलमध्ये एकादा राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले आहे. यावेळी त्याने भविष्यात अशा प्रकारे संधी मिळाली तर नक्की बाद करु असे ठामपणे म्हणाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!