🕒 1 min read
लातूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत राज्यासह जिल्ह्यात ही कोरोना प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल, अशा सर्व ठिकाणांना काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पालन होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून केली असताना सुद्धा नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
असाच एक प्रकार पानगावात घडला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही तो आदेश मोडीत काढत पानगावचा आठवडी बाजार भरला. दरम्यान पानगावात आणखी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता कोरोनाबाधितांची संख्या चार झाली आहे. रेणापूर तालुक्यात पानगावात ११४ पर्यंत कोरोना बाधितांचा आकडा गेला.
तरीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे भान न ठेवता शनिवारचा आठवडी बाजार भरला. बाजारात भाजी विक्रेत्याचा तोंडाला मास्क नव्हते, तर भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्याही तोंडाला मास्क नव्हते. गेल्या शनिवारी दुपारी पोलिसांनी जबरदस्तीने बाजार उठवला. तरीही या आठवडी बाजार भरल्याने जिल्हाधिकारी याबाबत काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळय़ात आधी जावे लागेल’
- आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना
- सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण
- BCCIचा मोठा निर्णय : ‘तो’ वादग्रस्त नियम बीसीसीआयने हटवला
- ‘कोरोना झाला तर जगाला सांगायची काय गरज’ या क्रिकेटपटूचा सचिनला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
