🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.
यादरम्यान भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून, भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे.
२६ जानेवारीला आंदोलकांनी घातलेला धुडघूस पाहता दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी खिळे असलेल्या ठोकण्यात आले आहेत. या मुद्द्यावरून अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील माजी मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
I'm surprised at this government, they've turned the place into fortress, barricaded it, have fixed nails & given rods to police as if Pakistanis are sitting there. They're your people, your farmers. The way they are being treated is shameful: SAD leader Harsimrat Kaur Badal pic.twitter.com/WNetgLmmFr
— ANI (@ANI) February 2, 2021
शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय, ती लाजिरवाणी गोष्ट आहे असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे.शेतकरी आंदोलनस्थळाला ज्या पद्धतीनं बालेकिल्ल्याचं स्वरुप दिलं गेलंय, ते पाहून मला या सरकारचं केवळ आश्चर्य वाटतं आहे. रत्यावर बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत, खिळे ठोकले गेलेत इतकंच नाही तर पोलिसांना लोखंडी हत्यारं देण्यात आली आहेत जणू काही सीमेवर पाकिस्तानी उभे आहेत. ही तुमचीच जनता आहे. तुमचेच शेतकरी आहेत, ज्यांना तुम्ही अशा पद्धतीनं वागवत आहात अशी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जो महाराष्ट्र वर्षभरात १ लाख ९० हजार कोटी जीएसटी देतो त्या महाराष्ट्राला काय मिळाले?
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा अर्थसंकल्प – हुसेन दलवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
