मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. परभणीत आयोजित भाजपच्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दानवे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा, असं म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.
दरम्यान, सामाना अग्रलेखातून महाविकास आघाडी सरकार टिकणारच असा दावा केला आहे. सामना अग्रलेखात, ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!
महत्वाच्या बातम्या
- एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव जिहाद’ झाल तरीही…
- ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही बाहेर पडावे, शिवसेनेचा भाजपला टोला
- ‘दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल’; दानवेंच पुन्हा भाकीत
- ‘महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको’
- लवकरच लस येणार? आदर पूनावालांनी दिली कोव्हिशिल्ड लसीबाबत महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

