पुणे : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाचीलागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
अशातच एक सकारात्मक वृत्त समोर येत आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती खुद्द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे.
“कमी किमतीत उपलब्ध होणारी कोव्हिशिल्ड लस एका प्रकारच्या डोसमध्ये कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरत आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या डोसमध्ये 62 टक्के प्रभावी आहे. याबाबतची विस्तृत माहिती संध्याकाळी देण्यात येईल.” असं आदर पुनावाला म्हणाले आहेत. तसेच, या लसचे वितरणदेखील लवकरच सुरु होईल अशी खुशखबर त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी ते काय माहिती सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून इतर अन्य कंपनीच्या लस देखील प्रगतीपथावर असल्याचं समजत आहे.
I am delighted to hear that, Covishield, a low-cost, logistically manageable & soon to be widely available, #COVID19 vaccine, will offer protection up to 90% in one type of dosage regime and 62% in the other dosage regime. Further details on this, will be provided this evening. https://t.co/KCr3GmROiW
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) November 23, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘आश्रम मधील जपनाम वाला भुपा आणि साहेबांवर टिका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच’
- आता राज्यपाल सुद्धा पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांचा टोला
- अनोळखी नंबर ओळखण्यासाठी गूगल लवकरच आणणार नवीन अॅप
- मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, अनिल परबांचा खळबळजनक आरोप
- नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे?; आंबेडकरांचा खोचक सवाल


