Share

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव जिहाद’ झाल तरीही…

Published On: 

मुंबई : आधी लव जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशाने स्वीकारली असे होणार नाही. बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव  जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील.

एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!

भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. अशातच हिंदुत्ववादाचं समर्थन करणारी शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत असताना राज्यात हा कायदा लावणार का यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला पेचात टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन पक्ष लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला समर्थन देण्यास अनुकूल नसतील. त्यामुळे यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्राद्वारे उत्तर दिले आहे.

मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो.

प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!