उस्मानाबाद: मागील काही काळात पोलीस पाटलांना मारहाण शिवीगाळ करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. या वाढत्या प्रकारामुळे राज्यतील महाविकास आघाडीने पोलीस पाटलांच्या सुरक्षिततेचा विचार करीत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पोलीस पाटलाला मारहाण किंवा शिवीगाळ केल्यास भा,द,वि कलम ३५३ अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
राज्यात या पुढे पोलीस पाटलासोबत हुज्जत घालणे महागात पडू शकते.पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संबंधिताविरुद्ध भा,द,वि कलम ३५३ अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
हा अध्यादेश ३ मार्च रोजी काढण्यात आला आहे. पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. अशा वेळी पोलीस पाटलाच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणी वर होता.
कलम ३५३ काय आहे ?
कलम ३५३ हा कायदा सरकारी कर्मचाऱ्यांचा सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्ती विरोधात सरकारी काम मध्ये अडथळा आणण्याच्या गुन्ह्या खाली २ वर्षाचा कारावास त्याच बरोबर आर्थिक दंडाची तरतूद आहे. या प्रकरणात कुठल्याही तडजोडीला वाव नसते.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार असल्याचा भाजपचा दावा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
