Share

“…या अधिवेशनात सर्व सामान्यांचे हित विचारात घेऊन निर्णय घेतले जातील”, अजित पवारांची ग्वाही

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आजच्या अधिवेशनात सर्व सामान्यांचे हित विचारात घेऊन निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली आहे.

यासंदर्भात अजित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांचं, गोरगरिबांचं, मजुरांचं, शेतकऱ्यांचं हित विचारात घेऊन निर्णय घेतले जातील, याची ग्वाही देतो.’

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी काही काळातच या पदाचा राजीनामा दिला. मागील अधिवेशनाचे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिले होते. त्यामुळे आता पुन्हा विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!