Share

हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार २६ विधेयके आणि अध्यादेश, वाचा सविस्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Convention) आजपासून (२२ डिसें.) सुरु झाले आहे. या अधिवेशनात जवळपास २६ विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यात प्रलंबित ५ विधेयके आणि मंत्रिमंडळ मान्यताप्राप्त २१ अशी एकूण २६ विधेयके आणि अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) उपस्थित होते.

अजित पवार यावेळी म्हणाले, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कामकाजाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान शुक्रवार दि. २४ डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील कामकाज कालावधीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात येणार आहे. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

ओबीसी, एससी, एसटी आरक्षण हे संविधानाने दिलेले आहे. त्या हक्कांचे रक्षण केलेच पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली आहे. मुख्यमंत्री अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होत आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आढावा बैठका होत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!