🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित लावली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला दिला.
पाटील म्हणाले होते की,’आरोग्याच्या बाबतीत आम्ही कोणाचे अहित चिंतणार नाही, पण आरोग्याच्या कारणाने तुम्ही राज्यावर अन्याय करु नका. सहानभूतीने राज्य कसं चालणार, किती दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेले नाही. तुम्ही लवकर बरे व्हा, पण तोपर्यंत राज्याचा कारभार कुणाकडे तरी सोपवावा.’ तसेच एक दिवस विदेशात जायचं असेल तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कोणावर भरोसाचच नाही, ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या, असा सल्लाही पाटलांनी दिला होता.
दरम्यान, पाटलांच्या या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून नवी-दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असतांना ते म्हणाले की,’तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री देखील सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतंय हे चंद्रकांत पाटलांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचं काम करावं , असे राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- चिंताजनक! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाने इस्त्रायलमध्ये पहिला मृत्यू
- “एकच गुन्हा महाविकास आघाडी सरकार पुन्हा…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
