🕒 1 min read
मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सहा विषयांपैकी मराठी आणि इंग्रजी वगळता सामान्य अध्ययनाच्या चार विषयांतील घटकांमध्ये फेरबदल केला आहे.आणि सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आल्याचे एमपीएससीने घोषणापत्राद्वारे जाहीर केले आहे.त्यामुळे विद्यार्थी वर्गात गोंधळाचे वातावरण आहे.पण सिलॅबस पाहता.तो सगळाच बदलला नसून त्यात काही घटकांचा समावेश करून तो अपडेट केलाय. राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येते.
राज्यसेवा मुख्य परीक्षा अशी असते
राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी एकूण सहा विषय असतात.मराठी आणि इंग्रजी या भाषेच्या दोन विषयासोबत सामान्य अध्ययन – १, सामान्य अध्ययन – २, सामान्य अध्ययन – ३ आणि सामान्य अध्ययन – ४ असे चार विषय असतात.मराठी आणि इंग्रजी हे भाषेचे पेपर प्रत्येकी १०० मार्कांचे असतात तर सामान्य अध्ययनाचे चार पेपर प्रत्येकी १५० मार्कांचे असतात.अशी एकूण ८०० मार्कांची मुख्य परीक्षा असते. सामान्य अध्ययनाच्या चार विषयांतील काही घटकांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रम घोषणापत्र प्रसिद्ध झालेल्या दिनाकांपासून पुढील परीक्षांसाठी लागू असेल, असे आयोगाने स्षष्ट केले आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतील सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आला असून, इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम आणि अधिकृत समजण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
याबाबत महाराष्ट्र देशाने काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.त्यावर साताऱ्याचा श्रावण जाधव म्हणाला की मुळात अपडेट केलेल्या उपघटकांवर एमपीएससी ने आधीच प्रश्न विचारले आहेत जसे की व्ही. व्ही. पॅट.त्यामुळे सिलॅबस अपडेट करण्याचा अभ्यासावर काही विशेष परिणाम होणार नाही.
तर नगरचा शुभम घोरपडे म्हणतो आता कुठं अभ्यासाला लिंक लागतं होती राव आणि अचानक सिलॅबस का अपडेट केला.आता पुन्हा नवीन संदर्भ ग्रंथ अभ्यासावे लागतील.
पुण्याची हर्षदा डोईफोडे म्हणते वाट लावणे काय असते हे एमपीएससी कडून शिकावे. आता या अशा काळात सिलॅबस अपडेट करण्याची काहीच गरज नव्हती.
धुळ्याचा नितीन सोनवणे म्हणाला धक्के देत राहणे हे एमपीएससी चे पूर्वापार स्टाईल आहे.त्यातूनच या करोना संकटाच्या काळात सिलॅबस उपडेट केला गेलाय.अशा उलट – सुलट प्रतिक्रिया एमपीएससीने सिलॅबस उपडेत केल्यावर विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत.
‘पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा करेल’
‘बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
