मुंबई : छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ आता ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणारी स्नेहा ‘काटा रुते कुणाला’ या मराठी मालिकेतून घराघरात पोहचली तर ‘ज्योती’ सह अनेक हिंदी मालिकांमधून झळकली आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या घरात मात्र आता स्नेहाला स्पर्धकांसोबतच तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत राहवं लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या एण्ट्रीसोबतच अभिनेता आविष्कार दारव्हेकरची एण्ट्री झाली आहे. अविष्कार घरात येताच स्नेहाच्या चेहऱ्यावरील बदललले हावभाव काही स्पर्धकांच्यादेखील लक्षात आले. यामागचं खरं कारण म्हणजे आविष्कार हा स्नेहाचा पहिला पती आहे. स्नेहा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेच आली होती.
दरम्यान अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला असल्याचा खुलासा केला होता. एकोणावीस वर्षांची असताना स्नेहाने अविष्कारसोबत लग्न केलं होतं. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. सात वर्षांनी स्नेहाने दुसऱ्यांदा इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत लग्न केलं. जवळपास आठ महिनेच टिकलं, स्नेहा दुसऱ्यापतीपासून देखील विभक्त झाली. तिच्या आयुष्यात खुप संघर्षमय प्रवास होता. आता बिगबॉसच्या घरातील तिचा काय अनुभव असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
