Share

Swara Bhaskar : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

स्वराने ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा… #MaharashtraPoliticalTurmoil”, असे कॅप्शन दिले आहे. स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सदेखील चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. स्वरा कायम भारतात होणाऱ्या घडामोडींवर तिची प्रतिक्रिया देत असते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!