Share

राजकारणाची पातळी खालावली, रोज उठून पाहावे लागते, आज कोणाचा नंबर?; संजय राठोड यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : महाराष्ट्राचे राजकारण सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे, राजकारणाची पातळी खालावली असून रोज सकाळी-सकाळी उठून पेपर मध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर आहे? अशी प्रतिक्रिया माजी मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर पत्रकारांशी चर्चा केली.

बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात राठोड हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यानिमित्त ते उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. यावेळी विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवरती त्यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्यावर देखील संकट आले मी स्वतः दीन दलीत समाजाला सेवा देण्याचं काम करतो बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे मी काम करत होतो. मात्र माझी ३० वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द विरोधकांनी उधळून फेकून दिली, असा आरोपही त्यांनी केला.

‘माझी चौकशी होऊ द्यायला हवी होती, मात्र तत्पूर्वीच माझ्यावर आरोप करण्यात आले तसेच तुम्हीच आरोप करता, तुम्हीच फाशीवर लटकावा म्हणता आणि तुम्हीच न्यायाधीश होता’, असे म्हणत हे महाराष्ट्रातील बदलत गेलेल हे राजकारण कुठ तरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्राची राजकारणातील वैभवशाली परंपरा जपली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!