Share

राज्य सरकारने ऑक्सिजन वापराबाबत जे पत्रक काढलं त्यावरून डॉक्टर्समध्ये गैरसमज पसरला, मात्र…

Published On: 

पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरला भेट देत आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आहे. पुण्यात कोरोना परिस्थिती बघता, बेड्सची कमतरता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तर, पुण्यात व्हेंटिलेटर, आयसीयू बेड्सची जेवढी उपलब्धता असायला हवी तितके नसल्याने अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात राजेश टोपे उद्या खाजगी रुग्णालय चालक-मालकांची महत्वाची बैठक घेणार आहेत. यावेळी, त्यांना ऑक्सिजन बेड्स पुरवायला भाग पडणार असल्याची भूमिका टोपेंनी घेतली आहे.

राज्य सरकारने ऑक्सिजन वापराबाबत पत्रक काढलं आहे. त्यावरून डॉक्टरांमध्ये गैरसमज पसरला असून ते पत्रक आयसीएमआरच्या नियमावलीनुसार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, रुग्णालयात डॉक्टर्सनी ठरवावं किती ऑक्सिजन वापरावा. या नियमावलीत मुद्दा क्रमांक ६ काढून टाकण्यात येईल. या मुद्यानुसार साधारण रुग्णाला ७ लिटर तर आयसीयू रुग्णाला १२ लिटर ऑक्सिजनचे असलेले बंधन त्यामुळे रद्द होणार आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/393823948463310/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!