नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आता आक्रमक होत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलने केली जात असून ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलावे अशी मागणी केली जात आहे.
मराठा आरक्षणाला समाजातील नागरिकांसह अनेक लोकप्रतिनधींचा देखील पाठिंबा मिळत आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र यावे यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार आता त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं आहे.
आतापर्यंत पाठिंबा दिलेल्या खासदार व इतर लोकप्राधिनिधींची नावे-
खा. श्रीरंग आप्पा बारणे ( मावळ )
खा. हेमंत आप्पा गोडसे ( नाशिक )
खा. डॉ. श्रीकांत शिंदे ( कल्याण )
खा. धैर्यशील माने ( हातकणंगले )
खा. नवनीतकौर राणा ( अमरावती )
खा. राहूल शेवाळे ( दादर )
खा. प्रतापराव जाधव ( बुलढाणा )
खा. ओमराजे निंबाळकर ( धाराशिव )
खा. डॉ. भारती पवार ( दिंडोरी )
खा. हिनाताई गावित ( नंदुरबार )
खा. रक्षा खडसे ( रावेर )
खा. डॉ. प्रितम मुंडे ( बीड )
खा. डॉ. सुजय विखे पाटील ( नगर )
खा. उन्मेष पाटील ( जळगाव )
आ.रवी राणा
माजी. आ. निर्मला गावित(इगतपूरी)
यांनी प्रत्यक्ष येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. ” माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी निवेदन देणार आहोत. सक्रिय पाठिंबा दिलेल्या सर्व खासदारांचे समाजाच्या वतीने, ‘समाजाचा घटक’ या नात्याने मी आभार व्यक्त करतो. आता बऱ्याच खासदारांनी संसदेत आवाज उठवायला सुरुवात केली आहे, त्यांचेही समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणखी ही खासदार येऊन भेटणार आहेत,” असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्यात आणि केंद्रात सर्वांना सोबत घेऊन माझे प्रयत्न सुरूच राहतील असे खासदार संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :-
- मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर बसून फुकटचे सल्ले देत आहेत ; नवनीत राणांनी केली राष्ट्रपती राजवटची मागणी
- राहुल गांधींना काँग्रेसचा जाहीरनामा माहिती नाही.. हा तर काँग्रेसचा बेगडीपणा
- मोठी बातमी : ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री वाबगावकर व्हेंटिलेटरवर! तर तब्बल २७ जणांना कोरोनाचा विळखा
- पारनेरमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव
- राहुल गांधींना काँग्रेसचा जाहीरनामा माहिती नाही.. हा तर काँग्रेसचा बेगडीपणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

