Share

बॉल टेम्परींग प्रकरणात आता स्टुअर्ट ब्रॉडने घेतली उडी; केले ‘हे’ वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. मात्र हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.

२०१८ साली झालेल्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील बॉल टेम्परींग प्रकरणात रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळत आहे. आता यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने उडी घेतली आहे. ब्रॉड म्हणाला की, ‘ डेव्हिड वॉर्नरच्या मॅनेजरने या प्रकरणाबाबत सर्व माहित आहे असा दावा केला. पण वॉर्नरने याबाबत काहीही सांगितले नाही. तो अजुन बोलला तर अजुन भरपुर गोष्टी समोर येतील.’ असे म्हणत ब्रॉडने वॉर्नरने ब्रॉडला असा सल्ला दिला, की निवृत्तीनंतर या प्रकरणावर एक पुस्तक लिहावे. ते पुस्तक वाचायला नक्किच मजा येईल. असा टोला लगावला.

कॅमरून बॅनक्रॉफ्टने बॉल टॅम्परिंग प्रकरणाची कल्पना गोलंदाजांना देखील होती, असे विधान करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्या सामन्यातील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत या आरोपांचा इन्कार केला. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!