नवी दिल्ली: भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसला परवानगी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. याबाबत भारताने त्यांच्या एका डोसला परवानगी दिली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन दिली आहे. त्यामुळे आता भारताकडे करोनाविरोधात एकूण ५ लसी असणार आहेत. याआधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे.
India expands its vaccine basket!
Johnson and Johnson’s single-dose COVID-19 vaccine is given approval for Emergency Use in India.
Now India has 5 EUA vaccines.
This will further boost our nation's collective fight against #COVID19
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 7, 2021
सध्याच्या दोन्ही भारतीय लशींचे दोन डोस घ्यावे लागतात, मात्र जॉन्सनची लस ही एकच डोसची असणार आहे. जॉन्सनच्या एकाच लसला आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे. ‘भारताने आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात करोनाविरोधात ५ लसीना परवानगी आहे. यामुळे देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल’, असे ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.
दरम्यान देशात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५० टक्के नागरिकांनी कोरोना पहिला डोस घेतला असल्याचे केंद्राने संसदेत स्पष्ट केले आहे. आता ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ला परवानगी भेटल्यामुळे यात आजू भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वच्या बातम्या
- रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ‘जैसे थे’; व्याजदराबाबत मोठा निर्णय
- शेवटच्या इंग्लंड दौऱ्यातून शिकलो, एंडरसन आणि ब्रॉडचा कसा सामना करायचा : केएल राहुल
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…


