Share

रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ‘जैसे थे’; व्याजदराबाबत मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.  कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेतून अर्थव्यवस्था आता सावरत आहे. पुरवठा व मागणीतील बिघडलेला समतोल पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर ठेवला असून यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने हा निर्णय सर्वसंमतीने घेतला आहे. लसीकरण आणि धोरणात्मक पाठबळ तसेच निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचाही त्यांनी स्पष्ट केले. महागाईबाबत रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे तसेच ग्रामीण भागातील मागणी वाढावी यासाठी अधिक प्रयत्न करण्यावर भर दिला जात आहे. मेमध्ये किरकोळ महागाईचा दर ६ टक्के राहिला. निर्धारित उद्दिष्टापेक्षा तो अधिक आहे. मागणीत सुधारणा होत असली तरी यासंबंधीची परिस्थिती सुधारताना दिसून येत नाही. ग्रामीण भागातील मागणीमुळे वस्तूपभोग वाढेल आणि  शहरांतील मागणीत हळूहळू सुधारणा होईल’

ऑगस्टमध्ये दोन टप्प्यांत ५० हजार कोटी रुपयांची सरकारी रोखे खरेदी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्याअंतर्गत १२ ऑगस्ट आणि २६ ऑगस्ट २०२१ अशा दोन टप्प्यांत प्रत्येकी २५ हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे रिझर्व्ह बँक खरेदी करणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने दरामध्ये बदल केलेला नाही. तर सध्याचे दर गेल्या १५ वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. बँकांना देण्यात आलेल्या कर्जावर रिझर्व्ह बँक घेत असलेल्या व्याजाला ‘रेपो दर’ असे म्हटले जाते. तर बँकांच्या वतीने रिझर्व्ह बँकेत जमा ठेवण्यात आलेल्या पैशांवर रिझर्व्ह बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्याजाला ‘रिव्हर्स रेपो’ दर असे म्हटले जाते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!