पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी कसे षडयंत्र रचत आहे याबाबत शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच नवाब मलिकांनी केंद्राच्या विरोधात भूमिका मांडली म्हणून त्यांच्या जावयावर कारवाई करण्यात आली. मलिकांच्या जावयाकडे सापडलेली वस्तू गांजा नव्हती, ती एक प्रकारची वनस्पती होती. कोर्टाच्या जामीन निकालातील हे निष्कर्ष होते असा दावा त्यांनी केला.
पवार म्हणाले, ‘अमली पदार्थाची एक यंत्रणा आहे, जी आजवर कोणाला माहिती नव्हती. नवाब मलिकांच्या नातेवाईकांसोबत काय घडतंय. त्यांच्यावर दबाव आणतायेत. ते केंद्रावर बोलतात, म्हणून त्यांच्यावर हल्ला करता येत नसल्याने त्यांच्या जावयाला अटक केली. नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला म्हणून अटक केली होती. पण संबंधित तज्ञ मंडळींनी हा गांजा नसून एक वनस्पती आहे, असं सांगितलं. मग न्यायालयाने जामीन दिला. पण यामुळं तुरुंगात अडकून रहावं लागलं’.
‘अंमली पदार्थ पथकाने दोन साक्षीदार आणले, त्यात एक गुन्हेगार असल्याचं समोर येतंय. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करताना एक पंच आणला. तो पंच गुन्हेगार असल्याचं समोर आलं. पण तेव्हापासून तो गायब आहे. पुणे पोलिसांनी त्याच्यासाठी वॉरंट काढलं आहे. म्हणजे हे गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करतात. गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करायची आणि चांगल्या लोकांना अडकवायचं, हेच धोरण या यंत्रणेचे दिसते अशी टीका पवार यांनी केली.
यावेळी त्यांनी ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केले. ‘चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. पण चौकशी केल्यानंतर काम संपल्यावर तिथे थांबू नये. पण बिचाऱ्या पाहुण्याचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी हे पावलं टाकली जात आहेत. यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय, असा दावा पवारांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- तालुक्यात विकासकामं केल्यावर मला शांत झोप लागते; दत्तामामांचा हर्षवर्धन पाटलांना सणसणीत टोला
- बाबांनो…तरीही पवारसाहेबांना पण विचारावं लागणार आहे; अजित पवारांचा यु टर्न
- उद्धव ठाकरेंचा दसऱ्यादिवशीच शिमगा, शेतकऱ्यांविषयी एकही शब्द काढला नाही- चंद्रकांत पाटील
- ‘उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यात गुंतवणूक असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल’


