Share

अत्याचारी मंत्र्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री हा विषय मात्र केवळ महाराष्ट्र विशेष – भातखळकर

Published On: 

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीवरून देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी विविध राज्यांचे दाखले देत देशातूल महिला अत्याचारांचा लेखाजोखाच मांडला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. यासोबतच, राज्यपालांची भूमिका ही सरकारविरोधी लोकांशी सुसंगत असून हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1440248307821932545?s=20

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्राचा आता भाजप नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘वाढत्या महीला अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय राष्ट्रव्यापी असल्याचे सांगितलेय. महिलाअत्याचार हा राष्ट्रव्यापी विषय असला तरी अत्याचारी मंत्र्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री हा विषय मात्र केवळ महाराष्ट्र विशेष आहे,’ अशी जहरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

वाचा मुख्यमंत्री ठाकरे यांचे सविस्तर पत्र –

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!