लखनौ – आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी दिलं आहे. नरेंद्र गिरी हे काल त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते. नरेंद्र गिरी यांना मी परवाच भेटलो होतो, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे मला धक्का बसला आहे, असं मौर्य म्हणाले. त्यांच्या मृत्यूमागचं कारण शोधून काढण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इस्लामविरोधी कंटेंट’; तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आयपीएल प्रक्षेपणास घातली बंदी
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणामुळे चर्चेत आलेले आनंद गिरी नेमके कोण आहेत ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
- महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या ? पोस्टमार्टमच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

