Share

प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडूनही शिक्षकांवर राज्य सरकारचा अन्याय; शिक्षक समितीचा आरोप!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना काळात शिक्षकांनी शासनाच्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन केले. कोरोना संदर्भातील विविध कामेही केली जात आहेत. मात्र असे असूनही राज्य शासनाकडून शिक्षकांमध्ये दुजाभाव केला जात आहे. राज्यात सुमारे ६० शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याची शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना द्यावेत, अशी मागणी आदर्श शिक्षक समितीतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा कक्षेत कर्तव्य बजावले. त्यात गाव पातळीवरील सर्वेक्षण, डेटा ऑपरेटर, लसीकरण, रेशन दुकानासह विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. याकाळात अनेक शिक्षकांना संसर्ग झाला. तर काहींचे निधन झाले. या शिक्षकांना सरकारने विमा कवच योजनेचे ५० लाखांचा लाभ अद्याप दिला नाही. यामुळे शिक्षकांवर अन्याय होत आहे.

शासनाच्या परिपत्रकामध्ये शिक्षकांचा नामोल्लेख नसल्याने तीव्र नाराजी शिक्षक वर्तुळात आहे. तसेच फ्रंटलाईन कोरोना योद्धे, डॉक्टर, पोलीस, नर्स, अंगवाडी सेविका, आशाताई, शिक्षक, आरोग्य कर्मचारी ज्यांच्या सेवा शासनाने अथवा स्थानिक प्रशासनाने अधिग्रहित केल्या. त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यासाठी प्रशासनाने विशेष उपचारासाठी स्वतंत्र कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, अंकुश काळे, माधव लातुरे, रामदास सांगळे, गिरीश नाईकडे, अनिल मूलकवार, सचिन हंगे, अंजूम पठाण यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!