मुंबई : इंडियातील उद्योगपती म्हणजे इंग्रजांची दुसरी अवलादच, असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी भारतीय उद्योगपतींवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतीला कायम दुय्यम स्थान का? उद्योगातील उत्पादने सहज भाववाढ करत असताना शेतमालाची भाववाढ अवास्तव वाटते आणि हे सर्व डोळ्यासमोर होत असताना सगळे शांत का? शेतकऱ्यांना वालीच राहिला नाही हे खेदाने मान्य करणे हा एकच पर्याय शिल्लक राहिलाय?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.
कारण, भारताला लूटण्याचे काम इंडियातील उद्योगपती वर्षानुवर्षं करत आहेत. इंडियातील उद्योगपती म्हणजे इंग्रजांची दुसरी अवलादच.
2/2#शेतकरी #Farmer #Supportfarmer— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 13, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले आहेत की,’या सर्वांचे कारण म्हणजे,भारताला लूटण्याचे काम इंडियातील उद्योगपती वर्षानुवर्षं करत आहेत. इंडियातील उद्योगपती म्हणजे इंग्रजांची दुसरी अवलादच’, असा घणाघात खोत यांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- दिल्लीत तक्रार दाखल झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ…’

