Share

आज भारतीय संघ ऑलआऊट होणार; माजी क्रिकेटपटूने केली मोठी भविष्यवाणी

Published On: 

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) मोठी भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्राने म्हटले आहे की, भारतीय संघ आज त्यांच्या दुसऱ्या डावात ऑलआऊट होईल आणि सामना रोमांचक वळणावर येईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली स्थिती मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसानंतर भारताने दुसऱ्या डावात 16/1 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांत आटोपला. भारताची एकूण आघाडी १४६ धावांवर गेली आहे. क्रीजवर केएल राहुल ५ आणि शार्दुल ठाकूर ४ धावांवर नाबाद होते.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीला डाव घोषित करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तो म्हणाले, “सामना अतिशय वेगाने होत असल्याने भारतीय संघ ऑलआऊट होईल, असा मला विश्वास आहे. भारतीय संघ चौथ्या दिवशी ऑलआऊट होणार असून या सामन्यात चांगलाच जल्लोष पाहायला मिळणार आहे. मला वाटतं 50 किंवा त्याहून अधिक दोन भागीदारी नक्कीच असतील.

“नवीन चेंडूने विकेट पडण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही आधीच मयंक अग्रवालची विकेट गमावली आहे पण तरीही मला वाटते की इथून दोन अर्धशतकांची भागीदारी होऊ शकते. हीच आशा आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवायचे आहे, जे त्यांना गाठता येणार नाही. संघात अजूनही अनेक दिग्गज फलंदाज आहेत. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि केएल राहुल अजूनही शाबूत आहेत. भारतीय संघ वेगवान फलंदाजी करू शकतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!